spot_img
spot_img
spot_img
spot_img

रुद्राभिषेक दिनानिमित्त शिवपार्वती महिला मंडळाचा धार्मिक-सामाजिक उपक्रम

विविध मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा-आरती व स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

बुलढाणा (Buldhana update/सुरेश फिस्के)  : रुद्राभिषेक दिनानिमित्त शिवपार्वती महिला मंडळ व महाराष्ट्र वीरशैव सभा, शाखा बुलढाणा यांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये महिला मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. महिलांनी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेत रुद्राभिषेक, पूजा व आरती केली. बुलढाणा येथील संभाजीनगर परिसरातील शिवमंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करून पूजा व आरती करण्यात आली. तसेच बुलढाणा येथील चैतन्यवाडी परिसरातील शिवमंदिरात जाऊन मंदिराची स्वच्छता करण्यात आली आणि मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. बिरसिंगपूर येथील कालभैरव मंदिर परिसरातही स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांना महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई फिसके तसेच डॉक्टर सुरेखाताई जतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपाध्यक्षा, कार्याध्यक्षा, सचिव तसेच महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. धार्मिक श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची जोड देत स्वच्छता, एकजूट आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा हा उपक्रम आनंददायी व यशस्वी ठरला.

ई पेपर

Related Articles

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर निलंबनाचा बडगा! ...

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी...

पिंपळनेरमध्ये मसाल्यांचा काळाबाजार उघड? ६०.८९ लाखांचा साठा जप्त; दोन परवाने निलंबित   मसाल्यांच्या कारखान्यांत अस्वच्छता, कीटकांचा वावर! अन्न प्रशासनाची धडक कारवाई

बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!