spot_img
spot_img
spot_img
spot_img

प्रकाश धुमाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी; नियुक्तीमुळे संघटनात्मक कार्याला बळ मिळण्याची अपेक्षा

Buldhana update / लोणार प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बुलडाणा जिल्हा कार्यकारिणीवर प्रकाश बंसलाल धुमाळ, लोणार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. जिल्हा कार्यकारिणीतील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे प्रकाश धुमाळ यांच्यावर जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोणार तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पक्षाचे संघटनात्मक कार्य वाढविणे, कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे तसेच पक्षाची भूमिका व विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने त्यांच्या नियुक्तीकडे पाहिले जात आहे. नियुक्तीपत्रात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे तसेच बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रकाश धुमाळ यांच्या नियुक्तीमुळे लोणारसह बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढवून पक्षाच्या संघटनात्मक उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्याची संधी या नियुक्तीमुळे निर्माण झाली आहे. दरम्यान, नियुक्तीबद्दल प्रकाश धुमाळ यांचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.

ई पेपर

Related Articles

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर निलंबनाचा बडगा! ...

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी...

पिंपळनेरमध्ये मसाल्यांचा काळाबाजार उघड? ६०.८९ लाखांचा साठा जप्त; दोन परवाने निलंबित   मसाल्यांच्या कारखान्यांत अस्वच्छता, कीटकांचा वावर! अन्न प्रशासनाची धडक कारवाई

बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!