देऊळगाव राजा (बुलढाणा अपडेट प्रतिनिधी) : जुने भांडण उफाळून आल्याने माळीपुरा परिसरात एका २८ वर्षीय तरुणाच्या पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कलम १०९(१) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळीपुरा येथील सोमेश प्रणयकांत डांगे (वय २८) याचा आरोपी केतन विजय तिडके याच्यासोबत जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपीने जवळील चाकूने सोमेशच्या पोटावर वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात सोमेश गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी सोमेशचे वडील प्रणयकांत श्रीराम डांगे (वय ६६) यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.०५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.






