spot_img
spot_img
spot_img
spot_img

मातंग समाजात शैक्षणिक क्रांतीच्या मशाली ची ज्योत घरा-घरात पेटवू…

Buldhana Update / मलकापुर:- आरक्षण उपवर्गीकरण चा लढा-लढत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेवुन मातंग समाजात शैक्षणिक क्रांतीच्या मशालीची ज्योत घरा – घरात पेटवत मुला/ मुलींना उच्च शिक्षणासाठी बाध्य करु असे प्रतिपादन शिवसेनेच्या शिव लहुसेना संघटना जिल्हाध्यक्ष निवृत्ती तांबे यांनी मौजे हरसोडा ता. मलकापूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलतांना केले दिनांक १४  ऑगस्ट रोजी मौजे हरसोडा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम चे वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून निवृत्ती तांबे बोलत होते पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की आता या पुढील अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतांना मातंग समाजातील उच्च शिक्षित तथा पदवीधारक मुला/ मुलींचे संमेलन आयोजित करण्यात येईल असा निर्धार ही त्यांनी या वेळी बोलतांना केला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शासनाचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मातंग समाजाचे जेष्ठ नेते विजय पारेकर हे होते तर प्रमुख उपस्थितीत हरसोडा सरपंच निवृत्ती तायडे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम चे पदाधिकारी तथा कार्यक्रमाचे आयोजक तुकाराम कसारे, व तालुका अध्यक्ष गणेश क्षिरसागर, स्वाभिमानी मातंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सुरळकर, ब्रास बँड संघटना तालुका अध्यक्ष नाना बोरले, गोविंदा वानखेडे ,,कडु सोनोने, विजय सोनोने, दयाराम सोनोने , समाधान सावळे,प्रविण अंभोरे व हरसोडा येथील भारत झाल्टे, सुखदेव मोरे, प्रल्हाद झाल्टे, गोविंदा कहाते, महादेव झाल्टे, अँड गोपाल रायपुरे, माजी उपसरपंच अनंत झाल्टे ,पांडुरंग देवकर रघुनाथ झाल्टे, शंकर धांडे ज्ञानेश्वर कहाते ,अमोल धाडे मंगल झाल्टे ,फरदिन शेख,रोशन झाल्टे, गुणवंत झाल्टे ,बाळा रायपुरे, सुनील कहाते ,अतुल कराळे ,शेख अहमद ,पुंडलिक मोरे ,तुळशीराम झाल्टे ,संजय मोरे , आदी मान्यवर उपस्थित होते.यासह आत्माराम कसारे, बळीराम कसारे ,मोतीराम कसारे ,काशीराम कसारे रूपचंद चंदनशिव ,संतोष कसारे ,चिंदाजी सोनवणे एकनाथ आव्हाड ,सिताराम कसारे, रमेश निकाळजे ,जगदेव वाघमारे ,गणेश कसारे, सागर कसारे ,श्रावण सोनवणे आदी. उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच निवृत्ती तायडे यांनी केले तर विजय पारेकर अध्यक्षीय व सुनिल कहाते यांनी मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे संचालन नाना बोरले व आभार प्रदर्शन अतुल कऱ्हाळे यांनी केले.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!