spot_img
spot_img
spot_img
spot_img

रायसिंग सोलंके यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

Buldhana Update / मलकापुर : मौजे काटी, ता. नांदुरा येथील शेतकरी रायसिंग सिताराम सोलंके यांचा दरोडेखोरांशी झुंज देताना दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी दरोडेखोरांचा प्रतिकार करताना त्यांनी प्राण गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या घटनेची सविस्तर माहिती देत रायसिंग सोलंके यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात यावी, अशी मागणी अॅड. साहेबराव मोरे, अध्यक्ष, किसान ब्रिगेड यांनी केली. निवेदनाची दखल घेत पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. या मागणीसाठी प्रसाद जाधव — जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी; अरुण अग्रवाल — जिल्हा उपाध्यक्ष; बाळू पाटील — जिल्हा उपाध्यक्ष; तसेच राजू डोफे — शहराध्यक्ष यांनी पाठपुरावा केला. रायसिंग सोलंके यांच्या धाडसाचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!