spot_img
spot_img
spot_img
spot_img

बंद घर हेरून चोरट्यांचा मोठा डल्ला; डोणगावातील डॉक्टरांच्या घरातून लाखोंचा ऐवज गायब

Buldhana update डोणगाव : गावात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. येथील वार्ड क्रमांक २ मधील खंडोबा परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर हेरून मोठी घरफोडी केली. प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. गजानन प्रल्हादराव पातुरकर यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना ९ ते १३ एप्रिलदरम्यान घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, डॉ. पातुरकर हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची माहिती मिळताच चोरट्यांनी संधी साधून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले व घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ करण्यात आला.चोरीमध्ये सोन्याच्या अंगठ्या, झुमके, नथ, गंठण तसेच चांदीचे विविध साहित्य नेण्यात आले. घरमालक परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला आणि एकच खळबळ उडाली.दरम्यान, पोलिसांनी १ लाख ७३ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची नोंद केली आहे. मात्र, सध्याच्या बाजारभावानुसार चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत यापेक्षा कितीतरी जास्त असल्याचे सांगितले जात आहे.याबाबत डॉ. पातुरकर यांनी सांगितले की, “जवळपास साडेदहा तोळे सोने आणि अर्धा किलो चांदीचे साहित्य चोरीला गेले. मात्र उपलब्ध पावत्यांनुसारच नोंद घेण्यात आली.” या प्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धिके करीत आहेत.गावात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर जानेफळ पोलिसांची धडक कारवाई

पाथर्डी येथे १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल बुलढाणा अपडेट अनिल राठोड जानेफळ मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू...

अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर जानेफळ पोलिसांची धडक कारवाई

पाथर्डी येथे १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल बुलढाणा अपडेट / अनिल राठोड : मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!