spot_img
spot_img
spot_img
spot_img

समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Buldhana update मेहकर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३१२ जवळ आज धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रकमधील मालासह वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, यूपी ६५ आरटी २१४० क्रमांकाचा ट्रक सर्व सरकारी एसी बससाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटऱ्या घेऊन मुंबईकडे जात होता. दरम्यान, चॅनल क्रमांक ३१२ परिसरात ट्रकमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने ट्रक पूर्णतः जळून खाक झाला.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत ट्रकमधील मोठा माल जळून खाक झाला होता.या आगीत अंदाजे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ट्रक चालक रोहित कुमार यांनी दिली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

ई पेपर

Related Articles

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर निलंबनाचा बडगा! ...

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी...

पिंपळनेरमध्ये मसाल्यांचा काळाबाजार उघड? ६०.८९ लाखांचा साठा जप्त; दोन परवाने निलंबित   मसाल्यांच्या कारखान्यांत अस्वच्छता, कीटकांचा वावर! अन्न प्रशासनाची धडक कारवाई

बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!