spot_img
spot_img
spot_img
spot_img

मिरवणुकांतील प्लास्टिक कागदांवर बंदी घाला; पर्यावरण व जनावरांच्या जीवितासाठी शैलेश सावजी यांचे धडक निवेदन

Buldhana update: बुलढाणा / प्रतिनिधी गावागावांत विविध सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांदरम्यान उधळण्यात येणाऱ्या बारीक प्लास्टिक कागदांमुळे पर्यावरण, सार्वजनिक स्वच्छता आणि जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने या प्रकारावर तातडीने बंदी घालावी, अशी जोरदार मागणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सपना सुबोधभाऊ सावजी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सादर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात विविध सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या मिरवणुकांमध्ये रंगीबेरंगी बारीक प्लास्टिक कागदांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मिरवणूक सुरू असताना हा कचरा आकर्षक वाटत असला तरी कार्यक्रम संपल्यानंतर तो रस्ते, नाले, सार्वजनिक ठिकाणे आणि गावातील विविध भागांत विखुरलेला दिसून येतो. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, हा प्लास्टिक कचरा पाण्याच्या नाल्यांमध्ये अडथळा निर्माण करतो. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे, दुर्गंधी निर्माण होणे आणि आरोग्याच्या समस्या वाढण्याचा धोका निर्माण होतो. तसेच गावात मोकाट फिरणाऱ्या गायी, बैल, शेळ्या व इतर जनावरे अन्न समजून हा प्लास्टिक कचरा खातात. प्लास्टिकमधील रासायनिक घटक त्यांच्या आरोग्यास घातक ठरत असून अनेकदा गंभीर आजार व मृत्यूचाही धोका निर्माण होतो.पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा कचरा अत्यंत घातक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्लास्टिक सहज विघटित होत नसल्याने मातीची गुणवत्ता कमी होते, तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडते. या पार्श्वभूमीवर मिरवणुकांमध्ये प्लास्टिक कागदांचा वापर व उधळण तातडीने बंद करावी, पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याबाबत जनजागृती करावी, ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनास योग्य सूचना द्याव्यात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शैलेश सपना सुबोधभाऊ सावजी यांनी केली आहे. या निवेदनामुळे पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून जिल्हा प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!