spot_img
spot_img
spot_img
spot_img

प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून शेतकऱ्याचा शेतात आमरण उपोषण

Buldhana update : डोणगाव येथील धक्कादायक प्रकार
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने, डोणगाव येथील शेतकरी मनोज श्रीकृष्ण नव्हाळे यांनी आता टोकाचे पाऊल उचले आहे. २३ मार्च २०२६, सोमवार पासून ते आपल्या शेतात (गट नं. ३५५, डोणगाव भाग ३) आमरण उपोषणास बसले आहेत निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.
शेतकरी मनोज नव्हाळे यांनी दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, त्यांच्या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच, त्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा. “जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मला नाईलाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे,” असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
उपोषणकर्त्याच्या प्रकृतीला काही इजा झाली किंवा जीवितास धोका निर्माण झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील, असा इशाराही नव्हाळे यांनी दिला आहे.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!