spot_img
spot_img
spot_img
spot_img

घरात घुसून प्राणघातक मारहाण… नेमकं कारण काय?

Breaking into a house and fatally beating… What is the real reason?

Buldhana update : बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावात दोन गटांमधील वादाने अत्यंत भीषण वळण घेत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने गावात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, इरफान अली यांच्या गटाकडून लोखंडी रॉड, टामी (लोखंडी सळई), काठ्या व दगडांचा वापर करून तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरावर अचानक हल्ला चढवण्यात आला. हल्लेखोरांनी घरात घुसून बेदम मारहाण केली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.या हल्ल्यात नौशाद शेख, जिलानी शेख, इमरान शेख, नसीर शेख आणि तनवीर शेख हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांना जालना येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्ला अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आला असून, आरोपींनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने प्राणघातक शस्त्रांचा वापर केला. जखमींना डोक्यावर, हात-पायांवर गंभीर मार लागल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.या प्रकरणी इरफान अली व त्यांच्या गटातील सदस्यांविरोधात जीवघेणा हल्ला, मारहाण व दंगल यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. घटनेमागील कारण, पूर्ववैमनस्य आणि हल्ल्याचा कट याबाबत चौकशी केली जात आहे.दरम्यान, या घटनेमुळे दुसरबीडसह संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून, नागरिकांनी शांतता राखावी व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!