spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

Buldhana update प्रतिनिधी अनिल राठोड: आज सकाळी परिसरात झालेल्या जोरदार पावसाने आणि विजांच्या कडकडाटाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. सकाळी ७:३० च्या सुमारास येथील ग्रामदैवत खंडोबा मंदिरावर अचानक वीज कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू होता. यावेळी मोहन काळे यांची आई मंदिरात दररोजप्रमाणे पूजा करत होत्या. पूजा सुरू असतानाच अचानक ढगांचा मोठा आवाज झाला आणि मंदिरावर वीज कोसळली. हा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक भयभीत झाले. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी संदीप पळसकर, विशाल खोरणे आणि रामा आखाडे यांनी सांगितले की, पाऊस सुरू असताना अचानक मंदिराच्या दिशेने लख्ख प्रकाश दिसला आणि मोठा आवाज झाला. वीज कोसळली त्यावेळी मंदिरात भाविकांची गर्दी नव्हती, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. मंदिराच्या काही भागाचे किरकोळ नुकसान झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण आहे.सुदैवाने मंदिरात पूजा करणाऱ्या माऊलींना कोणतीही इजा झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मंदिरात धाव घेतली.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!