spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगाव येथे उपोषणादरम्यान प्रशासनाची धाव; तक्रारदाराच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चेचे आश्वासन

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोड डोणगाव आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेले मनोज श्रीकृष्ण नव्हाळे यांच्या आंदोलनाची दखल अखेर प्रशासनाने घेतली आहे. २४ मार्च २०२६ रोजी उपोषणस्थळी महसूल आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा केली.नव्हाळे यांनी गट क्र. ३५६/२ मधील जमिनीच्या संदर्भात उद्भवलेल्या वादाबाबत हे उपोषण पुकारले होते. त्यांच्या मुख्य दोन मागण्या होत्या खरेदीची नोंदणी न करता केवळ १०० रुपयांच्या मुद्रांकावर (बॉन्ड पेपर) करण्यात आलेला बेकायदेशीर फेरफार रद्द करण्यात यावा. गट क्र. ३५६/२ मधील जमिनीच्या वाटणीबाबत तहसील कार्यालयाकडून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.उपोषणाची माहिती मिळताच नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी नव्हाळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या तक्रारींबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून तातडीने अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.या चर्चेनंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलकांचे समाधान झाले असून, वरील मागण्यांवर गांभीर्याने विचार करून लवकरच मार्ग काढला जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी परिसरातील नागरिक आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!