spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिंदी येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !

Buldhana Update / सिंदखेडराजा तालुक्यातील आदर्श शाळा असलेल्या शिंदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेमध्ये आकर्षक रांगोळी काढण्यात आले होती,भारत मातेच्या वेशभूषा मध्ये समोर असलेल्या मुलीला छानपैकी सजवण्यात आले होते  त्यानंतर सकाळी भारत माता की जय’ वंदे मातरम भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो चिरायू होवो  अशा प्रकारच्या घोषणा देत सदर मुलांचे प्रभात फेरी प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळून मारुती मंदिर जवळून ग्रामपंचायत कार्यालय समोरून डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून परत शाळेमध्ये नेण्यात आली  त्यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष नितेश खरात व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले शालेय समितीचे सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिकांचा यावेळी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सय्यद सर यांनी केले त्यांनी शाळेमधील सुविधान चा अभाव कोणकोणता आहे यावर प्रकाश टाकला  त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या एमटीएस परीक्षेमध्ये सुवर्णपदक विजेत्या मुलांचा सत्कार करण्यात आला
त्यानंतर चिमुकल्याने स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे केली  यावेळी सेवानिवृत्त शिक्षक तेजराव किसन खरात यांनी शाखेतील विद्यार्थ्यांना लेटर बुक भेट म्हणून दिले  सदर कार्यक्रमाला  सरपंच सौ साधना अशोक खरात , शालेय व्यवस्थापन समितीचे नितेश खरात ,उपाध्यक्ष दिगंबर बंगाळे तंटामुक्तीचे अध्यक्ष परमेश्वर खरात  गावच्या पोलीस पाटील वैशाली हाडे ‘ उपसरपंच वैशालीताई खरात , पत्रकार सचिन खंडारे , पत्रकार दादाचा सरपंच पती अशोकराव खरात ,विलास बंगाळे सर , रमेश गिरी , किरण तांबोळी , माजी सैनिक काशिनाथ बुरुकुल , भाऊराव चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य  विलास गवई गणेश खरात , संदीप बंगाळे , मंदाकिनी ज्योती बिबे , बंगाळे , इंदुबाई यरमुले , अनिता मोरे , सुमनबाई तोडे ,बचत गटाच्या स्वाती मार्के ,खरात बाई ,अंगणवाडी सेविका प्रमिलाबाई बंगाळे सुनीता खरात , कमल बेलोडे . सुनिता बेलोडे , ज्योती मोरे ,बंगाळे बाई , मिनाबाई गवई , अशोक तोडे ,अजय खंडागळे , अरविंद खंडारे ,विशाल खंडागळे, रमेश तोडे , दिनकर तोडे , ज्ञानेश्वर जाधव ,संतोष साळवे गजानन भांड, वायाळ  त्याचबरोबर मुख्याध्यापक सय्यद, शिक्षक वृंद इंगळे  , लोमटे , परिहार  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ‘ सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पडघान  यांनी केले तर आभार इंगळे  यांनी केले

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!