Buldhana Update/ सिंदखेडराजा : एका बाजूला जिल्हा परिषद शाळा काही ठिकाणी डगबगाईला आली असता दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद शाळा सुविधा पूर्ण झाली पाहिजे यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहे त्या निमित्ताने काहीजण वही पेन मुलांना खाऊ त्याचबरोबर डिजिटल बोर्ड इतर वस्तू शाळेला देण्यासाठी तत्पर असतात शासन स्तरावरून पाहिजे तसा शासन निधी जिल्हा परिषद शाळेला मिळत नसल्यामुळे अनेक सुविधाचा अभाव त्या ठिकाणी जाणवतो या निमित्ताने सिंदखेड राजा तालुक्यातील आदर्श शाळा असलेल्या शिंदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये तीन चार व पाच वर्गातील खोलीमध्ये तीन सिलिंग फॅन बंद पडले होते तसेच मुलांना कचरा टाकण्यासाठी ( कचराकुंडी ) डस्टबिन सुद्धा उपलब्ध नव्हती ही गोष्ट जेव्हा पत्रकार सचिन खंडारे यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सर यांना सांगितले की मुलांसाठी तीन वर्ग खोल्यातील मुलांसाठी चांगल्या कंपनीचे फॅन मी उपलब्ध करून देतो त्याचबरोबर साथ डस्टबिन सुद्धा देतो , त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद यांना ३ सिलिंग फॅन त्याचबरोबर ७ वर्ग होण्यासाठी डस्टबिन 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सुपूर्द केले ‘ तसे यावेळी पत्रकार तथा सरपंच पती अशोकराव खरात विलास बंगाळे तंटामुक्ती अध्यक्ष परमेश्वर खरात , अशोक तोडे किरण तांबोळी हजर होते यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने पत्रकार सचिन खंडारे यांचे आभार मानण्यात आले त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षक तेजराव किसन खरात यांनी सुद्धा वर्ग सातव्या वर्गातील मुलांना नोटबुक भेट म्हणून दिले तर शालेय समितीचे उपाध्यक्ष दिगाबर बंगाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पोह्याची व्यवस्था केली त्याचबरोबर वर्ग सातव्यातील खोलीमध्ये एक सिलिंग फॅन सुद्धा दिला ‘ त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना एक चांगली सुविधा मिळणार असून शाळेसाठी प्रत्येकाने समोर येऊन सढळ हाताने मदत करावी असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले





