Buldhana Update / सिंदखेड राजा : दरेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आत्माराम बंगाळे तर उपाध्यक्षपदी राहुल साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची आहे. समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाल्याने गावकऱ्यांसह समितीच्या सर्व सदस्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष आत्माराम बंगाळे व उपाध्यक्ष राहुल साबळे यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. निवड प्रक्रियेसाठी गावकरी, पालक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.यावेळी उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.





