Buldhana Update / डोणगाव:देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भारतीय जनता पार्टी (भाजप) डोणगाव मंडलच्या वतीने परिसरात १४ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा’ मोहीम अत्यंत उत्साहात राबवण्यात आली. या अभियानांतर्गत भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर जाऊन नागरिकांच्या घरोघरी तिरंगा ध्वज लावला आणि त्यांच्यासोबत सेल्फी व फोटो घेतले.या देशप्रेमाच्या मोहिमेत संपूर्ण डोणगाव मंडलमध्ये तब्बल १,००० राष्ट्रीय ध्वज (झेंडे) नागरिकांना वितरित करून घरांवर लावण्यात आले. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात देशमय वातावरण निर्माण झाले होते.प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थितीया अभियानाचे यशस्वी नियोजन आणि अंमलबजावणी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. यामध्ये भाजप तालुका अध्यक्ष विलास परमाळे, ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर अजगर, भाजप तालुका उपाध्यक्ष संतोष पांडव, भाजपचे ज्येष्ठ नेते देविदास चव्हाण, गणेश भांगे, रामेश्वर पांडव, स्वप्नील कळसकर आणि गणेश चव्हाण प्रामुख्याने सहभागी झाले होते.नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादघरोघरी जाऊन राबवण्यात आलेल्या या अभियानात भाजपच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील असंख्य पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. अबालवृद्धांनी आपापल्या घरावर अत्यंत अभिमानाने तिरंगा फडकवून पंतप्रधानांच्या या मोहिमेला पाठिंबा दिला.





