spot_img
spot_img
spot_img
spot_img

“तुकाराम मुंडेंचे रक्त भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या शरीरात सोडा!” – मुख्य सचिवांना माजी राज्यमंत्र्यांचे खळबळजनक पत्र

Buldhana update डोणगांव: महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारे एक आगळेवेगळे पत्र समोर आले आहे. माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र लिहून अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या रक्ताचा वापर शासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर करण्याची आगळी मागणी केली आहे. सावजी यांनी पत्रात तुकाराम मुंडे यांना “कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणारे अधिकारी” असे संबोधत त्यांच्या कार्यशैलीचे जोरदार कौतुक केले आहे. राज्यातील अनेक अधिकारी भ्रष्टाचार आणि गैरकारभारात अडकले असून त्यांच्यात प्रामाणिकपणाचा संचार व्हावा यासाठी मुंडे यांच्या रक्ताचे प्रतीकात्मक “संक्रमण” करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे, “तुकाराम मुंडे यांच्या शरीरातील एक बाटली रक्त काढून ते शासनातील सर्व खाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडे थोडे देण्यात यावे,” अशी मागणी. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची प्रेरणा निर्माण होईल आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनेल, असा दावा सावजी यांनी केला आहे. सावजी यांनी मुख्य सचिवांकडे या मागणीवर तातडीने कारवाई करण्याची विनंती केली असून केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्याची मागणीही केली आहे. या अनोख्या पत्रामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ई पेपर

Related Articles

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर निलंबनाचा बडगा! ...

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी...

पिंपळनेरमध्ये मसाल्यांचा काळाबाजार उघड? ६०.८९ लाखांचा साठा जप्त; दोन परवाने निलंबित   मसाल्यांच्या कारखान्यांत अस्वच्छता, कीटकांचा वावर! अन्न प्रशासनाची धडक कारवाई

बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!