spot_img
spot_img
spot_img
spot_img

अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर जानेफळ पोलिसांची धडक कारवाई

पाथर्डी येथे १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा अपडेट अनिल राठोड जानेफळ मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीवर जानेफळ पोलिसांनी धडक कारवाई करत १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन जानेफळ हद्दीतील ग्राम पाथर्डी येथे अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ठाणेदार आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने बुधवारी छापा टाकला. या कारवाईत दत्ता उत्तम चव्हाण (वय ५२, रा. पाथर्डी, ता. मेहकर) याच्या ताब्यातून ९ लिटर हातभट्टी दारू (किंमत रु. ९००), एक प्लास्टिक कॅन (रु. १००), २३० लिटर गुळमिश्रित मोह सडवा (रु. ११,५००) तसेच १६ टपरी पिपे (रु. ३२०) असा एकूण १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १८१/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव यांनी दिली असून, गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ काकड यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार आदिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार व पोलीस कॉन्स्टेबल विष्णू जगताप यांनी संयुक्तपणे पार पाडली.पोलीस प्रशासनाने अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!