spot_img
spot_img
spot_img
spot_img

अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर जानेफळ पोलिसांची धडक कारवाई

पाथर्डी येथे १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा अपडेट / अनिल राठोड : मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीवर जानेफळ पोलिसांनी धडक कारवाई करत १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस स्टेशन जानेफळ हद्दीतील ग्राम पाथर्डी येथे अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ठाणेदार आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने बुधवारी छापा टाकला.या कारवाईत दत्ता उत्तम चव्हाण (वय ५२, रा. पाथर्डी, ता. मेहकर) याच्या ताब्यातून ९ लिटर हातभट्टी दारू (किंमत रु. ९००), एक प्लास्टिक कॅन (रु. १००), २३० लिटर गुळमिश्रित मोह सडवा (रु. ११,५००) तसेच १६ टपरी पिपे (रु. ३२०) असा एकूण १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १८१/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव यांनी दिली असून, गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ काकड यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार आदिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार व पोलीस कॉन्स्टेबल विष्णू जगताप यांनी संयुक्तपणे पार पाडली.पोलीस प्रशासनाने अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

ई पेपर

Related Articles

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर निलंबनाचा बडगा! ...

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी...

पिंपळनेरमध्ये मसाल्यांचा काळाबाजार उघड? ६०.८९ लाखांचा साठा जप्त; दोन परवाने निलंबित   मसाल्यांच्या कारखान्यांत अस्वच्छता, कीटकांचा वावर! अन्न प्रशासनाची धडक कारवाई

बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!