spot_img
spot_img
spot_img
spot_img

खत विक्रीतील गैरप्रकारांवर कठोर कारवाईच्या मागणीला क्रांतिकारी शेतकरी संघटनेला यश

मेहकर तालुक्यात कृषी सेवा केंद्रांच्या विशेष तपासणीचे निर्देश

Buldhana update / मेहकर, प्रतिनिधी : आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर मेहकर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमधील खत विक्री व गुणवत्ता नियंत्रणाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्याने संबंधित विभागाने तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर प्रकाश टाले यांनी याबाबत निवेदन सादर केले असून शेतकऱ्यांना वेळेवर, योग्य दरात व दर्जेदार शेती निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार काही कृषी सेवा केंद्रांवर रासायनिक खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच दरफलक व साठा फलक अद्ययावत नसणे, जादा दराने खत विक्री करणे व कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मेहकर तालुक्यातील प्रमुख बाजारपेठा व कृषी सेवा केंद्रांवर अचानक तपासणी मोहीम राबवून दोषी आढळणाऱ्यांवर खत नियंत्रण आदेश १९८५ तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समजते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने तत्काळ व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!