spot_img
spot_img
spot_img
spot_img

समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Buldhana update मेहकर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३१२ जवळ आज धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रकमधील मालासह वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, यूपी ६५ आरटी २१४० क्रमांकाचा ट्रक सर्व सरकारी एसी बससाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटऱ्या घेऊन मुंबईकडे जात होता. दरम्यान, चॅनल क्रमांक ३१२ परिसरात ट्रकमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने ट्रक पूर्णतः जळून खाक झाला.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत ट्रकमधील मोठा माल जळून खाक झाला होता.या आगीत अंदाजे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ट्रक चालक रोहित कुमार यांनी दिली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!