spot_img
spot_img
spot_img
spot_img

गुरु – शिष्याच्या नात्याला काळीमा, संतप्त ग्रामस्थांनी विकृत मास्तरला चोपले लोणी गवळी येथील घटना

Buldhana update: डोणगाव :तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनींशी नराधम शिक्षकाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना बुधवार, ८ एप्रिल उघडकीस आले. हे प्रकरण समजताच संतप्त ग्रामस्थांनी शाळा गाठून नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला.लोणी गवळी येथे ही घटना घडली. येत्या तारीख ३० जूनला हा शिक्षक सेवानिवृत्त होणार होता.महादेव आत्माराम मानतोडे (वय ५८) हल्ली मुक्काम मेहकर असे या विकृत शिक्षकाचे नाव आहे. लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकाने तिसऱ्या वर्गातील तीन मुलींचा विनयभंग केला. मागील काही काळापासून त्याच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या काही मुलींसोबत हे घाणेरडे कृत्य या शिक्षकाने केले. या प्रकाराबद्दल कुठे काही वाच्यता केल्यास तो जीवाने मारण्याच्या धमक्या द्यायचा. यामुळे भयभीत झालेल्या मुलींनी ही घटना कोणाला सांगितली नाही. दरम्यान, ८ एप्रिल रोजी या विकृताने तीन मुलींसोबत लैंगिक चाळे केले. त्यांना कपडे उतरायला लावले. शिक्षकाच्या या कृत्याबद्दल मुलींनी आपल्या आई, वडिलांना ही घटना सांगितली. संतापलेल्या पालकांनी सकाळी दहा वाजता शाळा गाठून मास्तरची चांगलीच धुलाई केली.घटनेबद्दलची माहिती समजताच डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे आपल्या सहकाऱ्यांसह शाळेत पोहोचले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शाळा आणि गावात तणाव निर्माण झाला. उपविभागीय अधिकारी खाडे यांनी पालकांची समजूत काढली. यावेळी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन डोणगाव पोलीस ठाण्यात हजर केले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!