spot_img
spot_img
spot_img
spot_img

मुख्याध्यापिकेला मारहाण व अश्लील शिवीगाळ; माजी मुख्याध्यापकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Buldhana update / मलकापूर : तामीरे मिल्लत उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेला मारहाण करून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सायकलपुरा येथील चार जणांविरुध्द मलकापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार उजमा परवीन मो.आतिफ (वय ३७) रा. मोहनपुरा या तामीरे मिल्लत उर्दू प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. १६ सप्टेंबर रोजी सकाळी त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या शालेय पोषण आहाराचे साहित्य मालवाहू वाहनातून खाली उतरवून घेत होत्या. यादरम्यान शाळेचे माजी मुख्याध्यापक नजरुल्लाह खान नसरुल्लाह खान (वय ५५) यांच्यासह मो.रफिक मो. सइद (वय ६९), मो. अस्लम मो. रफिक (वय ३९) व मो. सलीम मो. नासीर (वय ४०) सर्व रा. सायकलपुरा हे तेथे आले. त्यांनी वाहनचालकाला हा माल नजरुल्लाह खान यांच्या सहीनेच खाली उतरावा असे म्हणत हरकत घेतली. त्यानंतर आरोपींनी शाळेच्या आवारात घुसून मुख्याध्यापिकेला चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेले त्यांचे वडील शेख हारूण शेख यासीन यांनाही चौघांनी मारहाण केली. तसेच मुख्याध्यापिकेला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची व गंभीर धमकी दिली. या प्रकरणी मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशनला आरोपींविरुध्द अप.नं. ६७८/२०२६ कलम २९६,३५२,३५१(२),३(५) बीएनएसएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करीत आहेत.

ई पेपर

Related Articles

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर निलंबनाचा बडगा! ...

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी...

पिंपळनेरमध्ये मसाल्यांचा काळाबाजार उघड? ६०.८९ लाखांचा साठा जप्त; दोन परवाने निलंबित   मसाल्यांच्या कारखान्यांत अस्वच्छता, कीटकांचा वावर! अन्न प्रशासनाची धडक कारवाई

बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!