spot_img
spot_img
spot_img
spot_img

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, खामखेड येथील रहिवासी व सध्या दीपकनगर, मलकापूर येथे वास्तव्यास असलेले संभाजीराव शिवाजी कुईटे (वय ४४, व्यवसाय शेती) यांनी त्यांची हिरो कंपनीची आय स्मार्ट मॉडेलची दुचाकी (क्र. एमएच २८ ए.के. ८३७३) घरासमोर उभी करून ठेवली होती. २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने सदर दुचाकी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.दुचाकीचा परिसरात शोध घेतल्यानंतरही ती मिळून न आल्याने कुईटे यांनी शेजारी जयवंत कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला आणि डोक्याला केशरी रुमाल बांधलेला, अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचा इसम दुचाकी घेऊन जाताना दिसून आला. याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील राऊत करीत आहेत.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

अतिक्रमणधारकांना पर्यायी व्यवस्था द्या; रमाई घरकुल योजनेत पारदर्शकता ठेवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)चे तहसीलदारांना निवेदन

Buldhana update / मलकापुर :- शहरातील बुलढाणा–चिखली महामार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, रमाई घरकुल योजनेची लाभार्थी निवड पारदर्शक पद्धतीने करावी तसेच ३०...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!