Buldhana Update / घाटबोरी (प्रा.) : श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाभावाचे अनोखे उदाहरण घडविले. सिद्धांताश्रम येथे भोजन आटोपल्यानंतर पालखी पुढील मार्गावर जात असताना वनपरिक्षेत्र कार्यालय घाटबोरी अंतर्गत वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पालखीतील भाविकांना चहा व केळीचे वाटप करून भक्तीमय वातावरणात सेवा बजावली. वनविभागाच्या हद्दीतील महत्त्वाच्या नाक्यावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून नियोजन व तयारी केली होती. पालखीचे आगमन होताच भाविकांचे मनोभावे स्वागत करून त्यांना चहा व केळीचे वाटप करण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेत भक्तीभावाने पूजनही केले. या सेवाभावी उपक्रमाचे नियोजन ए. बी. येवले, वनपरिक्षेत्र अधिकारी घाटबोरी (प्रा.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल येवले यांनी सर्वांचे अभिनंदन केले. वनविभागाच्या या उपक्रमामुळे पालखीतील भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी जी. ए. मंजुळकर, वनपाल घाटबोरी वर्तुळ; ए. ए. गिते, वनपाल मांडवा वर्तुळ; एन. बी. जाधव, वनरक्षक घाटबोरी-१ बिट; एस. डी. काकड, वनरक्षक घाटबोरी-२ बिट; एस. टी. गायकवाड, वनरक्षक पाथर्डी बिट; बी. बी. खोडवे, वनरक्षक वागदेव बिट; एस. ए. पडघान, वनरक्षक वडाळी बिट; एन. बी. विनकर, वनरक्षक जनूना बिट; डी. एस. पवार, वनरक्षक मांडवा बिट; एस. बी. गुद्दे, वनरक्षक वरवंड नाका; तसेच पी. पी. तायडे, वनरक्षक मोहना बिट यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.‘कर्तव्याबरोबरच भक्ती आणि माणुसकीची सेवा’ या भावनेतून वनविभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे पालखीतील भाविकांनी कौतुक केले. चहा-केळीचा प्रसाद स्वीकारल्यानंतर श्री गजानन महाराजांच्या पालखीने पुढील मार्गाकडे प्रस्थान केले.





