spot_img
spot_img
spot_img
spot_img

कवी विनोद हिवाळे यांच्या साहित्यिक कर्तृत्वाला पुरस्कारांची मानाची पावती

‘लेक लाडकी’सह विविध कवितांना राज्यस्तरीय व साहित्यिक पुरस्कार; लोणारच्या साहित्यविश्वाचा गौरव

Buldhana Update / लोणार | प्रतिनिधी :-  तालुक्यातील साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक, कौटुंबिक आणि मानवी भावभावनांना प्रभावीपणे शब्दबद्ध करणारे कवी व लेखक विनोद ज्ञानदेव हिवाळे यांच्या साहित्यिक योगदानाची विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी दखल घेतली आहे. त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाला मिळालेल्या पुरस्कारांमुळे लोणार तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कवी विनोद हिवाळे यांच्या ‘लेक लाडकी’ या कवितेला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, ६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुरस्कार आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्याचा समाजरत्न पुरस्कार अशा विविध मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नागपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात ‘सासर माहेर’ या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. नुकताच ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ यासाठीही कवी विनोद हिवाळे यांची निवड झाल्याचे निवडपत्रातून स्पष्ट होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांचा गौरव करण्याच्या उपक्रमांतर्गत ही निवड करण्यात आली आहे. कवी विनोद हिवाळे यांच्या लेखणीतून सामाजिक वास्तव, नातेसंबंध, स्त्रीजीवन, कुटुंबव्यवस्था आणि समाजातील विविध प्रश्नांना संवेदनशील व प्रभावी शब्दरूप मिळते. त्यामुळे त्यांच्या कवितांना व साहित्याला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सातत्याने मिळणारे पुरस्कार त्यांच्या साहित्यिक प्रवासाला अधिक बळ देणारे ठरत आहेत. ‘लेक लाडकी’पासून ‘सासर माहेर’पर्यंत विविध कवितांना मिळालेला सन्मान हा त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचा आणि सामाजिक जाणिवेचा गौरव आहे, अशी भावना साहित्यप्रेमी व रसिकांकडून व्यक्त होत आहे. कवी विनोद हिवाळे यांच्या या उल्लेखनीय साहित्यिक वाटचालीबद्दल लोणार तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळातही त्यांच्या लेखणीतून दर्जेदार व समाजप्रबोधनपर साहित्याची निर्मिती व्हावी, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

 

पुरस्कारांची ठळक नोंद :

– ‘लेक लाडकी’ कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

– ६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुरस्कार

– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्याचा समाजरत्न पुरस्कार

– नागपूर साहित्य संमेलनात ‘सासर माहेर’ कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार

– राष्ट्रसंत गाडगेबाबा समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ साठी निवड.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!