spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगाव–आरेगाव रस्त्याच्या कामाला गती; पालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश!

Buldhana Update / बुलढाणा : शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पालकमंत्री मकरंदजी आबा पाटील यांची सकारात्मक भूमिका मेहकर–लोणार तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. मकरंदजी आबा पाटील यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या समवेत भेट घेऊन विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करत डोणगाव–आरेगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा विशेषत्वाने पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने शेतकरी, विद्यार्थी, वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. “रस्ता केवळ डांबरीकरणाचा विषय नसून तो शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला प्रश्न आहे,” अशी भूमिका मांडत रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली.या मागणीची पालकमंत्री ना. मकरंदजी आबा पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने डोणगाव–आरेगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष कायम!शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न मार्गी लागेपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संघर्ष सुरूच राहणार, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल मोरे, दत्तात्रय जेऊघाले,  ॲड.सुरडकर, प्रफुल्ल….. यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डोणगाव–आरेगाव रस्त्याच्या प्रश्नावर आता निर्देश झाले; पुढची खरी परीक्षा संबंधित विभागाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीची!

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!