spot_img
spot_img
spot_img
spot_img

घरावर झेंडा लावताना भीषण दुर्घटना; करंट लागून युवकाचा जागीच मृत्यू, आई जखमी

बुलढाणा अपडेट/ गणेश पळसकर,केनवड : वाशिम जिल्ह्यातील केनवड येथे मंगळवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घरावर झेंडा लावत असताना लोखंडी पाईपचा 33 केव्ही उच्चदाब वीजवाहिनीशी संपर्क आल्याने संकेत संतोष खराटे (वय 22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची आई सुलोचना संतोष खराटे या जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राथमिक माहितीनुसार, संकेत खराटे हे आपल्या घरावर झेंडा उभारत होते. यासाठी वापरण्यात येत असलेला लोखंडी पाईप हातातून सुटून जवळून जाणाऱ्या 33 केव्ही वीजवाहिनीवर पडला. पाईप त्यांच्या हातात असल्याने त्यामध्ये विद्युतप्रवाह उतरला आणि त्यांना जबरदस्त विजेचा धक्का बसला. या भीषण धक्क्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेदरम्यान मदतीसाठी धावलेल्या त्यांच्या आई सुलोचना खराटे यांनाही विजेचा धक्का बसून दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.या हृदयद्रावक घटनेमुळे केनवड गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. अवघ्या 22 वर्षांच्या तरुणाचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटनेची नोंद घेऊन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!