spot_img
spot_img
spot_img
spot_img

रोजा सोडण्याच्या काही क्षण आधीच काळाचा घाला; शेलगाव देशमुख येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

(बु.अ.प्र.) डोणगाव (अनिल राठोड): मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ६ मार्च रोजी सायंकाळी रोजा सोडण्याची तयारी सुरू असतानाच, एका ३० वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शेलगाव देशमुख येथील रहिवासी शेख हबीब शेख कालू (वय ३०) हा तरुण गुरुवारी (६ मार्च) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गावातील एका व्यक्तीच्या घरची विजेची समस्या सोडवण्यासाठी खांबावर चढला होता. हबीब हा खासगी स्वरूपाची वीज कामे करायचा. काम करत असताना अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का लागला आणि तो खांबावरून थेट जमिनीवर कोसळला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.रमजानचा महिना सुरू असल्याने हबीबच्या घरी रोजा सोडण्याची (इफ्तारची) तयारी सुरू होती. घरची मंडळी त्याची प्रतीक्षा करत होती. मात्र, इफ्तारच्या काही क्षण आधीच हबीबच्या मृत्यूची बातमी धडकली. ज्या घरात आनंदाचे वातावरण होते, तिथे क्षणात शोककळा पसरली.मृत हबीबवर शेलगाव देशमुख येथील स्मशानभूमीजवळ अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, एका कष्टाळू तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर जानेफळ पोलिसांची धडक कारवाई

पाथर्डी येथे १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल बुलढाणा अपडेट अनिल राठोड जानेफळ मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू...

अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर जानेफळ पोलिसांची धडक कारवाई

पाथर्डी येथे १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल बुलढाणा अपडेट / अनिल राठोड : मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!