spot_img
spot_img
spot_img
spot_img

काळाचा घाला: एका जीवघेण्या अपघातातून सावरले, पण दुसऱ्या अपघाताने शरद जाधव यांचा घेतला बळी

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोड डोणगाव एका जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या भीषण अपघाताने एका व्यक्तीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना डोणगाव परिसरात घडली आहे. मालेगाव-मेहकर रोडवरील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ भरधाव ‘काळी-पिवळी’ने दिलेल्या धडकेत शरद गणपतराव जाधव (५५) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. शरद जाधव हे ५ मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या एका सहकाऱ्यासह मोटारसायकलने मालेगावच्या दिशेने जात होते. वाशिम जिल्ह्याच्या हद्दीतील बळीराजा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर निघत असतानाच, मालेगाव कडून डोणगावच्या दिशेने येणाऱ्या भरधाव काळी-पिवळी टॅक्सीने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत जाधव यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.उपचारादरम्यान मृत्यू अपघातानंतर त्यांना तातडीने मेहकर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने ६ मार्च रोजी त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात येत होते. दुर्दैवाने, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.शरद जाधव यांच्याबाबत नियतीने अत्यंत क्रूर खेळ खेळला आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी डोणगाव येथील अतिया पेट्रोल पंपाजवळ त्यांचा मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांचे सहकारी जाकीर शाह मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर जाधव यांचे दोन्ही पाय मोडले होते. गेल्या १५-२० दिवसांपासून ते कसाबसा आधार घेऊन चालायला लागले होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. एका अपघाताच्या सावटातून बाहेर येत असतानाच दुसऱ्या अपघाताने त्यांचा घात घेतला.शरद जाधव हे मूळचे डोणगावचे जावई असून मागील अनेक वर्षांपासून ते येथेच स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात  मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने डोणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!