spot_img
spot_img
spot_img
spot_img

होळीच्या दुसऱ्याच दिवशी रक्ताची होळी! मेहकरमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून

खंडाळा MIDC परिसरात थरारक घटना; प्रेमप्रकरणातून हत्येची चर्चा

बुलढाणा अपडेट/मेहकर प्रतिनिधी :

होळीचा सण संपताच मेहकर परिसरात एका तरुणाच्या निर्घृण हत्येने परिसर हादरून गेला आहे. मेहकर-खामखेड रोडवरील खंडाळा MIDC परिसरात जांब आढाव येथे राहणाऱ्या राहुल खुशालराव बाजड (वय २७) या तरुणाचा दगडाने चेहरा ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राहुल बाजड हा मूळचा मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होता. गेल्या काही वर्षांपासून तो वाशीम जिल्ह्यातील जांब आढाव येथे आपल्या मामाकडे राहत होता. केनवड येथे त्याने ‘आपलं कलेक्शन’ नावाचे कापडाचे दुकान सुरू केले होते.३ मार्च रोजी अज्ञात आरोपीने राहुल बाजड याला मेहकर परिसरात नेऊन त्याचा दगडाने चेहरा ठेचून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ४ मार्चच्या सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार, एपीआय संदीप बिरांजे, एपीआय जारवाल, पोहेकॉ लक्ष्मण कटक व मोहम्मद परसुवाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.दरम्यान, या हत्येमागे प्रेमप्रकरणातून वाद झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या घटनेमुळे मेहकर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अधिक तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!