spot_img
spot_img
spot_img
spot_img

रंगपंचमीच्या दिवशीच काळाचा घाला: पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेल्या मजुराचा अपघाती मृत्यू; पातूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी आलेगाव संदीप राठोड: हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्याला ना सणासुदीचा आनंद, ना सुटीची ओढ. कुटुंबाला दोन वेळची भाकरी मिळावी यासाठी निघालेल्या मजुरांवर रंगपंचमीच्या दिवशीच काळाने घाला घातला. मोकाट डुक्कर आडवे आल्याने मजुरांचा ऑटो उलटून झालेल्या भीषण अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना पातूर तालुक्यातील गावंडगाव-पांगरताटी परिसरात ३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, पांगरताटी येथील काही मजूर नेहमीप्रमाणे रोजंदारीसाठी ऑटोने बाहेरगावी जात होते. पहाटेच्या अंधारात गावंडगाव येथील पुलाजवळ अचानक एक मोकाट डुक्कर ऑटोसमोर आले. डुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑटो रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात प्रवासी रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांची धाव, एकाचा मृत्यूअपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या अपघातात गंभीर जखमी झालेले राजू दामू जाधव (रा. पांगरताटी) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. इतर काही जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवरया अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेल्या या कष्टकऱ्याच्या निधनाने पांगरताटी गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर जानेफळ पोलिसांची धडक कारवाई

पाथर्डी येथे १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल बुलढाणा अपडेट अनिल राठोड जानेफळ मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू...

अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर जानेफळ पोलिसांची धडक कारवाई

पाथर्डी येथे १२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल बुलढाणा अपडेट / अनिल राठोड : मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!