spot_img
spot_img
spot_img
spot_img

सहकार विद्या मंदिरमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा 

बुलढाणा अपडेट (प्रतिनिधी) अनिल राठोड 19 फेब्रुवारी: डोणगाव येथील इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचा जीवनपट नृत्यनाटीकेच्या माध्यमातून प्रस्तुत केला. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गाढे सर होते तर प्रमुख वक्ते किशोर जाधव सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडला.

तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. भाषणे, नृत्य नाटिका, गीत, वेशभूषा इत्यादी कार्यक्रमांनी शालेय परिसर भारावून गेला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टेकाळे सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनी राजश्री मेटांगळे व हर्षदा बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचा सांस्कृतिक विभाग, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!