spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.. डोणगाव येथील जि.प. उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी जोपासली कृतज्ञता! 

बुलढाणा अपडेट (प्रतिनिधी): अनिल राठोड, डोणगाव “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही,” या महामानवाच्या विचारांचा वारसा डोणगाव येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी कृतीतून सिद्ध केला आहे. आपल्या शाळेप्रती असलेली ओढ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्ग ४ थी ‘ब’ मधील विद्यार्थ्यांनी शाळेला एक प्रेरणादायी भेट दिली आहे.या वर्गातील विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीमध्ये या शाळेत प्रवेश घेतला होता. मागील चार वर्षांपासून येथील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास घडवून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर उत्तम संस्कारांची शिदोरीही या विद्यार्थ्यांना दिली. आता पुढील शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे. आपण ज्या शाळेत घडलो, त्या शाळेची आठवण सदैव राहावी या भावनेतून मंतशा शेख सलिम आणि तिच्या ग्रुपने एक स्तुत्य उपक्रम राबवला.विद्यार्थ्यांनी शाळेच्या कार्यालयाची शोभा वाढवण्यासाठी आणि भविष्यातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवण्यासाठी भारतीय सैन्यातील धडाडीच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांचे छायाचित्र सप्रेम भेट म्हणून दिले. कर्नल सोफिया कुरेशी या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत अखिल भारतीय पुरुष तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. २०१५ च्या भारत-पाकिस्तान संघर्षात ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील त्यांची भूमिका आणि सायबर युद्धातील त्यांचे कौशल्य हे देशासाठी अभिमानास्पद आहे. अशा महान व्यक्तिमत्वाचे छायाचित्र देऊन विद्यार्थ्यांनी आपली प्रगल्भता सिद्ध केली आहे.या छोटेखानी भेट सोहळ्याच्या वेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक शेख रब्बानी सर यांच्यासह झाकीर सर, रफीक सर, अन्वर सर, वासिम सर, कलीम सर, इरफान सर, मुजीब सर, अझहर सर, अस्लम अली शाह सर, रुकैया मॅडम आणि गजाला मॅडम उपस्थित होत्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून, ही भेट शाळेसाठी आणि येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिलेली ही भेट ‘शाळा’ आणि ‘विद्यार्थी’ यांच्यातील अतूट नात्याचे दर्शन घडवणारी ठरली आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!