spot_img
spot_img
spot_img
spot_img

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मेहकर तालुक्यातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

जळगाव खान्देश येथे पुरस्कार सोहळा; विठ्ठल धांडे यांना ‘कृषिरत्न’, तर प्रितेश डहाके यांना ‘कृषी गौरव’ पुरस्कार

मेहकर ( बुलढाणा अपडेट/सुरेश फिस्के ) : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून शेतकरी, शेती आणि ग्रामीण विकासासाठी योगदान देणाऱ्या मेहकर तालुक्यातील मान्यवरांचा जळगाव खान्देश येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या वतीने सन २०२६ चे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये मेहकर तालुक्यातील उप कृषी अधिकारी विठ्ठल धांडे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रितेश डहाके यांना ‘कृषी गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यासोबतच शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राजुभाऊ पळसकर, बबन पळसकर आणि दिपक पळसकर यांना ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून शेतकऱ्यांना प्रोत्साहन, आधुनिक शेतीचा प्रसार आणि शेतीच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या या सर्व मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने मेहकर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या पुरस्कारामुळे कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच प्रोत्साहन मिळणार असून, मेहकर तालुक्यातून विविध स्तरांवर होत असलेल्या कृषीविषयक उल्लेखनीय कामाची राज्यस्तरावर दखल घेतली जात असल्याचे या सन्मानातून अधोरेखित झाले आहे. पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

ई पेपर

Related Articles

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर निलंबनाचा बडगा! ...

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी...

पिंपळनेरमध्ये मसाल्यांचा काळाबाजार उघड? ६०.८९ लाखांचा साठा जप्त; दोन परवाने निलंबित   मसाल्यांच्या कारखान्यांत अस्वच्छता, कीटकांचा वावर! अन्न प्रशासनाची धडक कारवाई

बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!