spot_img
spot_img
spot_img
spot_img

लोणार नगरपरिषदेला कायमस्वरूपी पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या!

नगरसेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत मापारी यांची उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

Buldhana update / लोणार, दि. १७ सप्टेंबर २०२६ : लोणार नगरपरिषदेला नियमित व पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजासह शहरातील विविध विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागसेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत राजेश मापारी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांच्याकडे लोणार नगरपरिषदेस तातडीने कायमस्वरूपी, नियमित व पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. सध्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला असून, त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांसोबत अतिरिक्त जबाबदारी येत असल्याने नगरपरिषदेच्या दैनंदिन कामकाजासह विकासकामांचे नियोजन, प्रशासकीय व तांत्रिक समन्वय, कामांची पाहणी, निधीचा नियमानुसार विनियोग आणि संबंधित विभागांशी सातत्यपूर्ण समन्वय साधण्यावर परिणाम होऊ शकतो, असे मापारी यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे. लोणार शहराला लोणार सरोवरामुळे ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनस्थळ म्हणून शहराची ओळख आहे. त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, पर्यटकांसाठी आवश्यक सोयी, शहर सुशोभीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामांना नियोजनबद्ध गती देण्यासाठी सक्षम प्रशासकीय नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नगरपरिषद क्षेत्रात सुरू असलेली तसेच प्रस्तावित विकासकामे विहित कालमर्यादेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध असणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लोणार नगरपरिषदेची प्रशासकीय कार्यक्षमता वाढवून शहराच्या पर्यटनदृष्ट्या नियोजित व शाश्वत विकासाला गती देण्यासाठी नियमित, पूर्णवेळ व स्वतंत्र मुख्याधिकारी यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी अनिकेत राजेश मापारी यांनी केली आहे. त्यांच्या निवेदनाच्या प्रती नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त अमरावती विभाग तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत.

ई पेपर

Related Articles

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर निलंबनाचा बडगा! ...

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी...

पिंपळनेरमध्ये मसाल्यांचा काळाबाजार उघड? ६०.८९ लाखांचा साठा जप्त; दोन परवाने निलंबित   मसाल्यांच्या कारखान्यांत अस्वच्छता, कीटकांचा वावर! अन्न प्रशासनाची धडक कारवाई

बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!