spot_img
spot_img
spot_img
spot_img

बाबुरावजी मापारी परिवाराची बहुआयामी व्यावसायिक वाटचाल प्रेरणादायी

शेतीपासून बांधकाम, करसल्ला, पेट्रोलियम व विविध व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी विस्तार; लोणार येथे AKM कन्सल्टन्सी व श्री प्लॅनिंग अँड स्ट्रक्चरल कन्सल्टंट्सच्या स्थलांतराचा शुभारंभ

Buldhana Update/ लोणार | प्रतिनिधी : शेतीपासून औषध व्यवसाय, कापड, मनोरंजन, मंगल कार्यालय, बांधकाम, करसल्ला, पेट्रोलियम आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांपर्यंत मापारी परिवाराने केलेली बहुआयामी व्यावसायिक वाटचाल ही परंपरा, विश्वास आणि नव्या पिढीच्या उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून आ.अमित झनक, मा.आ. डॉ संजय रायमुलकर, बाबुरावजी मापारी, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ खुशालरावजी मापारी, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी, युवा सेना जिल्हा प्रमुख ॠषी जाधव , साहेबरावजी काटे,श्री श्री १००८ चैतन्य महाराज, एडवोकेट उल्हासराव जाधव , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हिंमतराव सानप, सभापती बळीराम मापारी, ठाणेदार प्रकाश सादगिर,ना.तहसिलदार मयुर इप्पर, मा.सभापती संतोषराव मापारी, शिवसेना न.पा.गटनेते मयुर गोलेच्छा हे उपस्थित होते लोणार येथे आयोजित एका खाजगी कार्यक्रमात AKM कन्सल्टन्सीचा शुभारंभ, श्री प्लॅनिंग अँड स्ट्रक्चरल कन्सल्टंट्सच्या स्थलांतराचा शुभारंभ तसेच श्रीराम मार्केट व साई पेट्रोलियमच्या शुभारंभानिमित्त ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते. कार्यक्रमाला मापारी परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, मापारी परिवाराची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे आजही परिवार एकत्रितपणे राहून विविध क्षेत्रांत काम करत आहे. बदलत्या काळानुसार व्यवसायाचा विस्तार करताना कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपापल्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. “आजच्या काळात प्रत्येकाला चार्टर्ड अकाउंटंटच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आदित्य मापारी यांच्या AKM कन्सल्टन्सीच्या माध्यमातून नागरिकांना करसल्ला व संबंधित आर्थिक सेवांची चांगली सुविधा उपलब्ध होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.तसेच अजिंक्य मापारी यांच्या श्री प्लॅनिंग अँड स्ट्रक्चरल कन्सल्टंट्सच्या माध्यमातून स्थापत्य व बांधकाम क्षेत्रात पुणे ते लोणार असा विस्तार झाल्याचे नमूद करत जाधव यांनी त्यांच्या व्यावसायिक वाटचालीचे कौतुक केले. आधुनिक बांधकाम क्षेत्रात तांत्रिक कौशल्य आणि दर्जेदार नियोजनाला मोठे महत्त्व असून, या माध्यमातून परिसरातील ग्राहकांना चांगल्या सेवा मिळतील, असे ते म्हणाले. साई पेट्रोलियम व श्रीराम मार्केटच्या माध्यमातूनही ग्राहकांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचा आनंद आहे, असेही प्रतापराव जाधव यांनी सांगितले. नव्या पिढीने पारंपरिक व्यवसायाची विश्वासार्हता कायम ठेवत आधुनिक व्यवसाय पद्धती, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक कौशल्याची जोड दिल्यास निश्चितच मोठी प्रगती साधता येते. मापारी परिवाराने याच पद्धतीने विविध क्षेत्रांमध्ये आपला विस्तार केला असून, त्यांच्या प्रगतीचा आलेख भविष्यातही असाच उंचावत राहो, अशा शुभेच्छा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने मापारी परिवाराच्या विविध व्यावसायिक उपक्रमांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, व्यावसायिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या उपक्रमांमुळे लोणार शहराच्या व्यावसायिक क्षेत्रालाही चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!