Buldhana Update / मलकापुर:- स्वातंत्र्य दिनाचे शुभ पर्वावर गर्दे वाचनालय (हॉल) बुलढाणा येथे दि.14 ऑगस्ट 26 रोजी जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत सुंदर गाव स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या ग्रामपंचायत चे सरपंच व संवेदनशील ग्राम येथील सरपंच यांचा सत्कार करण्याकरिता CEO संग्राम अभियान जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन होऊन त्यानंतर जिल्हा परिषद मार्फत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर शासनाच्या आर.आर. आबा सुंदर गाव स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक मिळणारे आदर्श ग्राम शेलगाव बाजार या गावाला मकरंद (आबा) पाटील पालकमंत्री बुलढाणा, प्रतापराव जाधव केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार, आ. संजय गायकवाड , आ. मनोज कायंदे, आ. सौ.श्वेताताई महाले,आ.सिद्धार्थ खरात, प्रवीण देवरे जिल्हाधिकारी बुलढाणा,गुलाबराव खरात मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलढाणा यांचे हस्ते व समस्त पदाधिकारी,अधिकारी यांचे उपस्थितीत सरपंच सौ सरलाताई अमित खर्चे व आर.एस.सुरळकर ग्रामपंचायतअधिकारी यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यापूर्वी आदर्श ग्राम शेलगाव बाजारला शासनाचे वेगवेगळे भरपूर पुरस्कार मिळाले असून गावाने एक शासन स्तरावर आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.या पुरस्कारामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.गावात केलेल्या विविध विकास कामे व विविध शासकीय योजना गावात व्यवस्थित राबवित असल्यामुळे गावाचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. त्या कार्यक्रमा नंतर बोलतांना सरपंच यांनी ह्याचे सर्व श्रेय सर्व ग्रामपंचायत सहकारी व समस्त गावकरी यांना दिले.या सर्वांच्या सहकार्यानेच हे साध्य झाले असी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली.





