spot_img
spot_img
spot_img
spot_img

न्यायालयातील बेलीफची लाचखोरी उघड; १० हजारांची लाच घेताना एसीबीची कारवाई

Buldhana update / मेहकर | दिवाणी न्यायालय, मेहकर येथील मालमत्ता जप्तीचे न्यायालयीन वॉरंट बजावू नये, यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना न्यायालयातील बेलीफ जगदीश सुखदेव राऊत (वय ३१) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) बुलढाणा पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ५३, व्यवसाय – शेती) यांच्या विरोधातील दिवाणी दाव्यात न्यायालयाने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट काढले होते. हे वॉरंट बजावू नये आणि तसेच परत करावे, यासाठी बेलीफ जगदीश राऊत यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करताना लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर झालेल्या तडजोडीत आरोपीने १० हजार रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शविली. त्यानुसार एसीबीने मेहकर बसस्थानक परिसरात सापळा रचून तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जगदीश राऊत याला रंगेहात ताब्यात घेतले.bआरोपी हा दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर), मेहकर येथे बेलीफ म्हणून कार्यरत असून त्याचे मूळ गाव साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) आहे. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांनी कारवाईचे पर्यवेक्षण केले. पथकात पोलीस कॉन्स्टेबल शैलेश सोनवणे, पंढरी शेळके आणि नितीन शेटे यांचा सहभाग होता. कारवाईस अँटी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.

■ एसीबीचे आवाहन : कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!