spot_img
spot_img
spot_img
spot_img

उन्हाळ्यात गावपुढाऱ्यांची होणार चांगलीच दमछाक…. लग्नसराईत निवडणुका जाहीर.

By-elections announced for 59 Gram Panchayats in Buldhana district.बुलडाणा जिल्ह्यातील 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर.

(Buldhanaupdate)बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 59 ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत च्या सरपंच व सदस्य पद रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलय.. जिल्ह्यातील रिक्त असलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी निवडणूक जाहीर झाली असून ऐन उन्हाळ्यात निवडणुकीचे राजकारण तापलेल बघायला मिळणार आहे, लग्नसराई वातावरणातील वाढलेला उकाडा वाढलेले तापमान आणि मोठ्या प्रमाणात असणार गावकीचं राजकारण या सर्वांची मोठी सांगड होणार असून येणारा काळ जिल्हा वासीयांसाठी महत्वकांशी ठरणार आहे. यामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी : दिनांक 7 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत मुदत असणार आहे. तर अर्ज छाननी ही दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम दिनांक 17 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख आहे.तर लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदान दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत राहणार असून मतमोजणी ही दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.दिनांक 17 मार्च 2026 मंगळवार पासून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत ती प्रभावी राहणार आहे.आदर्श आचारसंहितेच्या काळात सर्व नागरिकांनी तिचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!