spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगावमध्ये भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रोहित वाघमारे यांची निवड

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोडडोणगाव: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, डोणगाव येथील वार्ड क्रमांक १ मध्ये ‘भीम जयंती उत्सव समिती’ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या निवडीमध्ये अध्यक्ष म्हणून रोहित वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. वार्डातील सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. समितीच्या उपाध्यक्षपदी संदीप वाकोडे यांची निवड झाली असून, जयंती उत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून निलेश सदावर्ते,योगेश धांडे,राज वाठोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त अध्यक्ष रोहित वाघमारे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आणि वार्ड क्रमांक १ मध्ये एक आदर्श जयंती साजरी करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.”या निवडीबद्दल वार्डातील समाजबांधवांनी आनंद व्यक्त केला असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या १३५ व्या भीम जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन या समितीमार्फत केले जाणार आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!