spot_img
spot_img
spot_img
spot_img

माजी विद्यार्थी याचा जिल्हा परिषद शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार. आजी विद्यार्थी यांच्या साठी घेतली रोबोटीक कार्यशाळा. 

आरेगाव व मादनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत रोबोटिक्स व ड्रोन कार्यशाळा संपन्न…

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी/ अनिल राठोड डोणगाव : महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेचे संचालक उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, आरेगावचे माजी विद्यार्थी आदरणीय सोहम वायाळ यांच्या विशेष प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी दि. ५ मार्च रोजी रोबोटिक्स व ड्रोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर येथील रोबोनिस्ट टेक सोल्यूशन यांच्या माध्यमातून घेण्यात आली.सदर कार्यशाळा ग्रामीण भागातील व स्वतः सारख्या खेड्यातून आलेल्या म्हणजे आरेगाव व मादणी येथे घ्यावी म्हणून सोहम वायाळ यांनी प्रयत्न केले तर या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शकांनी रोबोटिक्स व ड्रोन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देत विविध प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी उडणारे ड्रोन तसेच सेन्सर वर सुरू होणारे दिवे व इतर साहित्य याबाबत विद्यार्थ्यासमोर प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत रोबोट्स प्रत्यक्ष हाताळून पाहिले व त्यांची कार्यपद्धती समजून घेतली. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण होऊन नवोपक्रमशीलतेला चालना मिळाली. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक संजय जुमडे व सर्व शिक्षक वृंद हजर होते. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी घेतलेला हा पुढाकार सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.तर मादणी येथे ही मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी यांना मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!