spot_img
spot_img
spot_img
spot_img

शेंदला -मोहना खुर्द रस्त्याची दुरवस्था  अपघातांच्या घटनांमध्ये वाढ, दुरुस्तीची मागणी

बुलढाणा अपडेट (अनिल राठोड/ डोणगाव )मेहकर तालुक्यातील

शेंदला -मोहना खुर्द रस्त्याची दुरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

 

नागरिकांना रस्त्यांच्या समस्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. शेंदला -मोहना खुर्द आणि शेंदला- नायगाव दत्तापुर या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. या रस्त्यांवर अपघात घडल्याच्या अनेक घटनांमध्ये काही जण जखमी झाले आहेत.

Related Articles

डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

Buldhana update प्रतिनिधी अनिल राठोड: आज सकाळी परिसरात झालेल्या जोरदार पावसाने आणि विजांच्या कडकडाटाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. सकाळी ७:३० च्या सुमारास येथील ग्रामदैवत...

काच नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी; डोणगावच्या शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

Buldhana update : डोणगाव परिसरातील काच नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे नदीपात्राची पाण्याची वहन क्षमता कमी झाली असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!