spot_img
spot_img
spot_img
spot_img

बुलढाण्यात राष्ट्रपतींचे स्वागत; पण पाणी, रस्ते, रोजगारासाठी शैलेश सावजी यांची जोरदार मागणी 

बुलढाणा अपडेट / सुबोध आखाडे , डोणगाव : बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रपती महोदयांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे माँ जन्मस्थान , संत गजानन महाराज संस्थान शेगाव, जगप्रसिद्ध लोणार सरोवर, ताराराणी यांसारख्या ऐतिहासिक व धार्मिक वारशाने स्वागत करण्यात येत असतानाच, जिल्ह्यातील गंभीर प्रश्नांवर थेट लक्ष वेधत जोरदार मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी राष्ट्रपती महोदयांना निवेदन पाठवून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गाव जोड रस्ते, शेत रस्ते, शेतीतील वीज, वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान, जिगाव प्रकल्प, शासकीय शाळांच्या इमारतींची दुरवस्था अशा अनेक विषयांकडे लक्ष वेधले आहे.निवेदनात विशेषतः माता-भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.यासोबतच लोणार सरोवर, शेगाव विकासकामांची प्रगती, तसेच जिल्ह्याच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या खामगाव–जालना रेल्वे मार्ग आणि शेगाव–पुणे मार्ग मुंबईशी जोडण्याची मागणी यावरही भर देण्यात आला आहे.

औद्योगिक क्षेत्राला चालना मिळाल्यास जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करत, या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती महोदयांनी वेळ द्यावा अशी विनंतीही सावजी यांनी केली आहे.

स्वागताच्या निमित्ताने बुलढाण्याचे प्रश्न थेट सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने हे निवेदन सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!