spot_img
spot_img
spot_img
spot_img

पारडी गावात गावठी दारूचा महापूर; गरिबांचे संसार उध्वस्त, जानेफळ पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह 

बुलढाणा अपडेट / अनिल राठोड: जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पारडी गावामध्ये सध्या अवैध गावठी दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असून, यामुळे गावातील शांतता धोक्यात आली आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांचे संसार उध्वस्त होत असून ग्रामस्थांमध्ये, विशेषतः महिला वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जुना थरार आठवताच गाव शहारते

पाच वर्षांपूर्वी पारडी गावात दारूच्या नशेत एका पित्याने स्वतःच्या मुलाच्या डोक्यात सळई मारून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर वडील सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. अशा भीषण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र, सध्या गावात घरोघरी मिळणाऱ्या दारूमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.

तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात

रोजगार नसल्याने हतबल झालेली तरुण पिढी आणि अल्पवयीन मुले सहज उपलब्ध होणाऱ्या या गावठी दारूच्या आहारी जात आहेत. यामुळे घरोघरी वादविवाद वाढले असून महिलांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अवैध धंद्यांकडे संबंधित बीट जमादार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अवैध धंदेवाल्यांना कोणाचे अभय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पारडी येथील त्रस्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी जानेफळच्या ठाणेदारांना या प्रकरणी वैयक्तिक लक्ष देण्याची विनंती केली आहे. “गावातील अवैध दारू विक्री तातडीने आणि कायमस्वरूपी बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!