spot_img
spot_img
spot_img
spot_img

जाणजो-छाणजो-पच-माणजो”चा संदेश देत सहकार शाळेत संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

डोणगाव : येथील बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीद्वारा संचालित सहकार विद्या मंदिर, डोणगाव येथे बंजारा समाजाचे थोर संत संत सेवालाल महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनील गाढे सर होते, तर प्रमुख वक्ते म्हणून चंद्रकांत नरवाडे सर उपस्थित होते. प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना नरवाडे सर म्हणाले की, संत सेवालाल महाराज हे आधुनिक विचारांचे, दूरदृष्टी असलेले थोर संत होते. “जाणजो, छाणजो, पच, माणजो” म्हणजे कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी तिची सखोल छाननी करून, सत्यता पडताळून पाहूनच योग्य निर्णय घ्यावा, असा मोलाचा संदेश त्यांनी अतिशय सोप्या शब्दांत सर्वसामान्य जनतेला दिला.

आपला पारंपरिक रसद पुरवठ्याचा व्यवसाय सांभाळत त्यांनी व्रतस्थ जीवन जगले. समाजाच्या रक्षणासाठी प्रसंगी त्यांनी निजामासमोर तलवार हातात घेऊन उभे ठाकण्याचे धैर्यही दाखवले. बंजारा समाजाला एकसंघ ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संत सेवालाल महाराजांनी केले.

“कोई केनी भजो मत, कोई केनी पुजो मत” अशी शिकवण देत त्यांनी अंधश्रद्धा व व्यक्तिपूजेचा ठामपणे निषेध केला. समाजातील तंटे-विवाद सामोपचाराने सोडवण्याची परंपरा सुरू करणारे ते पहिले संत होते, असेही नरवाडे सर यांनी सांगितले.

याच विचारांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राचे दिवंगत गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी २००७ साली तंटामुक्त ग्राम अभियान योजना सुरू केली. संत सेवालाल महाराजांच्या विचारांची ही शिदोरी आजही समाजाला दिशा देत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!