spot_img
spot_img
spot_img
spot_img

पिंपळनेरमध्ये मसाल्यांचा काळाबाजार उघड? ६०.८९ लाखांचा साठा जप्त; दोन परवाने निलंबित   मसाल्यांच्या कारखान्यांत अस्वच्छता, कीटकांचा वावर! अन्न प्रशासनाची धडक कारवाई

बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न व औषध प्रशासनाने २५ ऑक्टोबर रोजी धडक कारवाई करत तब्बल ४७ हजार ८८५ किलो मसाल्यांचा, ६० लाख ८९ हजार ६४६ रुपये किमतीचा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आस्थापनांच्या अन्न व्यवसाय परवान्यांचे निलंबन करण्यात आले. एका आस्थापनेत अस्वच्छता, मांजर, कबुतरे व कीटकांचा वावर, तर दुसऱ्या आस्थापनेत वैध परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्यासह विविध त्रुटी आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.अस्वच्छ वातावरणात मसाल्यांची निर्मिती आणि साठवणूक?पिंपळनेर येथील मे. जनता सेवा मिरची मसाला इंडस्ट्रीज या आस्थापनेच्या तपासणीदरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. परिसरात अस्वच्छता होती. मांजर, कबुतरे आणि कीटकांचा वावर आढळला, तर कीटक नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले. कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचा अभाव, अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवणे आणि अन्नपदार्थांचे चाचणी अहवाल उपलब्ध नसणे, अशा बाबी तपासणीत समोर आल्या. याशिवाय, ‘JSM’ ब्रँडच्या कांदा-लसूण मसाल्याच्या लेबलमध्ये दोष आढळले. तसेच कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून सुटी मिरची पावडर, हळद पावडर आणि अख्खी हळद यांचा साठा जप्त करण्यात आला. या आस्थापनेतून एकूण ४७ हजार ३८१ किलो मसाल्यांचा, ५७ लाख ९५ हजार ८४६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. परवानाधारक जागा बंद; दुसरीकडे व्यवसाय सुरू! मे. अनोखे फूड्स अँड स्पाइसेस या दुसऱ्या आस्थापनेच्या तपासणीतही नियमपालनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या बाबी आढळल्या. परवाना असलेल्या गट क्रमांक ८१ येथील जागेवर कामकाज सुरू नसताना अन्य ठिकाणी वैध परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. अन्नपदार्थांचे चाचणी अहवालही उपलब्ध नव्हते. या आस्थापनेतून ‘अनोखे’ ब्रँडची २३८ किलो लाल मिरची पावडर, २०८ किलो हळद पावडर आणि ५८ किलो धने पावडर असा एकूण ५०४ किलो मसाल्यांचा, २ लाख ९३ हजार ८०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. सणासुदीच्या काळात अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दोन्ही आस्थापनांमधून जप्त करण्यात आलेल्या मसाल्यांच्या साठ्याचे एकत्रित वजन ४७ हजार ८८५ किलो असून त्याची किंमत ६० लाख ८९ हजार ६४६ रुपये आहे. अन्न व औषध प्रशासनाने दोन्ही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत.ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावती विभागाचे सहआयुक्त (अन्न) एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली, बुलढाण्याचे सहायक आयुक्त (अन्न) प्र. शि. पाटील यांच्या निर्देशानुसार व उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी अ. सं. भोपाळे यांनी केली.जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी अशा तपासण्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. आता नमुना तपासणीच्या अहवालातून मसाल्यांच्या गुणवत्तेबाबत काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

ई पेपर

Related Articles

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर निलंबनाचा बडगा! ...

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी...

डोणगाव बसस्थानकासमोर विनापरवाना बॅनरचा जीवघेणा धोका; प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले!

बॅनर कोसळून मोठा अनर्थ घडला असता; परवानगी देतो कोण, जबाबदारी घेणार कोण? बुलढाणा अपडेट / डोणगाव : डोणगाव बसस्थानकासमोर रस्त्यालगत लावण्यात आलेला बॅनर कोसळल्याने प्रवाशांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!