spot_img
spot_img
spot_img
spot_img

घाटबोरी वनपरिक्षेत्रात लाखोंच्या अवैध वृक्षतोडीचा आरोप; महिला वनरक्षकावरच दबाव आणल्याची तक्रार!

 

भोसा वनखंड क्र. १८१ मधील वृक्षतोडीने खळबळ; RFO अंकुश येवले यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल, वरिष्ठांकडे तक्रार

 

बुलढाणा अपडेट / मेहकर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यातील घाटबोरी वनपरिक्षेत्रातील भोसा वनखंड क्र. १८१ मध्ये लाखो रुपयांच्या अवैध वृक्षतोडीचा आरोप झाल्याने वन विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गस्तीवर असलेल्या महिला वनरक्षक सौ. एम. के. मोरे यांच्या निदर्शनास मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे आल्याचा दावा असून, त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतरही त्यांच्यावरच दबाव आणण्यात आल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. घटनास्थळी तोडलेली लाकडे तसेच लाकूड वाहतुकीच्या खुणा आढळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, या प्रकरणाची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर महिला वनरक्षकाला घटनास्थळापासून दूर ठेवण्यात आले, हॅमर व पी.ओ.आर. बुक घेण्यात आले आणि “तुम्ही टेन्शन घेऊ नका” अशा स्वरूपाचा दबाव आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर संबंधित वृक्षतोडीबाबत कारवाई करताना आपल्याला जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आल्याचेही महिला वनरक्षकाने म्हटले आहे. या प्रकारामुळे वनांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतच कोणाचा वरदहस्त आहे का? अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना नेमके कोणाचे संरक्षण मिळते? असे संतप्त सवाल उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची प्रत मुख्य वनसंरक्षक अमरावती, उपवनसंरक्षक बुलढाणा तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिला वनरक्षकाने आपल्या जीवितास धोका असल्याची भीतीही व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रकरण आता केवळ वृक्षतोडीपुरते मर्यादित राहिले नसून, वन विभागातील अंतर्गत दबाव, कारवाईतील पारदर्शकता आणि अवैध वृक्षतोडीमागील कथित संगनमताची निष्पक्ष चौकशी होणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भोसा वनखंडातील वृक्षतोड नेमकी कोणी केली, किती झाडांची तोड झाली, लाकूड कुठे गेले, त्याची परवानगी होती का आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, याची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. वन वाचविणाऱ्याच महिला वनरक्षकाला जर दबावाला सामोरे जावे लागत असेल, तर जंगलाच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल आता घाटबोरी परिसरातून जोर धरू लागला आहे.

 

ई पेपर

Related Articles

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर निलंबनाचा बडगा! ...

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकारी...

पिंपळनेरमध्ये मसाल्यांचा काळाबाजार उघड? ६०.८९ लाखांचा साठा जप्त; दोन परवाने निलंबित   मसाल्यांच्या कारखान्यांत अस्वच्छता, कीटकांचा वावर! अन्न प्रशासनाची धडक कारवाई

बुलढाणा अपडेट / देऊळगाव राजा : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!