वारकरी परंपरा, भक्ती-संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम
Buldhana update / लोणार (प्रतिनिधी) : श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी आमदार डॉ .संजय रायमुलकर यांच्या वतीने लोणार येथील जय मल्हार महिला भजनी मंडळाला टाळांचे व साहित्याचे वितरण करण्यात आले. मंडळाच्या वतीने आयोजित भंडारा कार्यक्रमादरम्यान हे साहित्य महिला भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.मागील दहा वर्षांच्या कालावधीत मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील शंभरपेक्षा अधिक वारकरी दिंड्या व भजनी मंडळांना रायमुलकर यांच्या वतीने टाळ, मृदंग, वीणा, तबला यांसह विविध भजन साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच मेहकर-लोणार तालुक्यातून पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकरी दिंड्यांसाठी डॉ. रायमुलकर परिवाराच्या वतीने निवाऱ्याच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणावर फोल्डिंग टेन्टचे वाटप करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच नैतिकता, संस्कार आणि सामाजिक एकोप्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला जातो. विविध धार्मिक कार्यक्रमांमधून युवा पिढीला सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळते. भजनी मंडळे ही भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत, असे मत संजय रायमुलकर यांनी यावेळी व्यक्त केले.मतदारसंघातील विकासकामांबरोबरच धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला बळ देण्यासाठी आपली भूमिका सातत्याने सकारात्मक राहिली आहे. अशा उपक्रमांना यापुढेही सहकार्य करण्याची भूमिका कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जय मल्हार महिला भजनी मंडळाच्या महिला भगिनी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, सुधाकर मादनकर, श्रीकांत मादनकर, लक्ष्मण नेवरे, प्रवीण नेवरे, दत्तात्रय नेवरे, संदीप मादनकर, राम मादनकर, समाधान मादनकर, संजय जाधव यांच्यासह भजनी मंडळाच्या पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.






