spot_img
spot_img
spot_img
spot_img

जनता महाविद्यालयात एकदिवसीय पोलीस भरती प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Buldhana Update/ मलकापुर:- जनता महाविद्यालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय पोलीस भरती प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्थानिक जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे एक दिवसीय पोलीस भरती प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. ही कार्यशाळा जनता महाविद्यालयातील व्यवसाय व समुपदेशन विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली- ही कार्यशाळा मलकापूर परिसरातील महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्वच युवक युवतींसाठी खुली व पूर्णपणे मोफत अशा स्वरूपात होती. मलकापूर परिसरातील मोठ्या संख्येने युवक युवती महाराष्ट्र पोलीस विभागात भरतीसाठी तयारी करत आहेत. अशा युवकांना पोलीस भरतीतील शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा संबंधी विस्तृत मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असे प्रतिपादन आपल्या प्रास्ताविकातून कार्यशाळेचे आयोजक व व्यवसाय व समुपदेशन विभागाचे समन्वयक प्रा. टी. पी. मोरे यांनी केले.
या कार्यशाळेला मलकापूर परिसरातील युवक युवतींचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने युवक युवतींनी या कार्यशाळेला उपस्थिती दर्शवली होते
या कार्यशाळेत मैदानी प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस विभागातील रविंद्र सपकाळ तसेच नांदुरा येथील पार्थ फिजिकल अकॅडमी चे तुषार पाटील यांची उपस्थिती लाभली होती- तसेच लेखी परीक्षा विषयक मार्गदर्शन करण्यासाठी मलकापूर येथील साहस अकॅडमीचे संचालक विशाल पाटील हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते-
ही कार्यशाळा तीन सत्रात संपन्न झाली. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात रविंद्र सपकाळ यांनी पोलीस भरतीतील मुलांसाठी असणारे 100 मीटर व 1600 मीटर तर मुलींसाठी असणारे 100 मीटर व 800 मीटर धावण्याची परीक्षा तसेच गोळा फेक याची तयारी कशी करावी, तयारी करताना दक्षता कोणती घ्यावी व आपला परफॉर्मन्स कोअर कसा वाढवावा यासंबंधी विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष मैदानावर धावणे व गोळा फेकीचा सराव तुषार पाटील यांनी प्रशिक्षणार्थ्यांचा सराव करून घेण्यात आला.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात पोलीस भरतीतील लेखी सराव परीक्षा घेण्यात आल. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात महाराष्ट्र पोलीस भरतीतील लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती याविषयी विस्तृत असे मार्गदर्शन विशाल पाटील यांनी केले. योग्य दर्जाचे मार्गदर्शन या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उच्च दर्जाचे मार्गदर्शन, प्रचंड मेहनत व प्रयत्नांचे सातत्य या त्रिसूत्रींच्या आधारावर यश हमखास मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना पोलीस विभागातील निवडीकरिता शुभेच्छा ही दिल्या. या कार्यशाळेला मलकापूर परिसरातील जनता महाविद्यालयाबरोबरच विज्ञान महाविद्यालय, अग्रवाल महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय अशा विविध महाविद्यालयातून एकूण 143 युवक युवतींनी सहभाग नोंदवला होता. जनता महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक विभागांचे व महाविद्यालयांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी या सर्वांचे एनसीसी विभाग प्रमुख प्रा वाय. एस. राजपूत यांनी आभार मानले.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!